ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक हिवाळी शिबीर १९९५-९६ या शैक्षणिक वर्षामध्ये गुंजाळवाडी येथे आयोजित केले होते. शिबिरामधील विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण ई. कामे मोठ्या उत्साहाने केली. त्यावेळी उपस्थित सर्वच गावकऱ्यानी ग्रामोन्नती मंडळास विनंती केली की, ग्रामोन्नती मंडळाने गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराची शाखा म्हणून इयत्ता आठवीचा वर्ग गुंजाळवाडीमध्ये सुरु करावा, कारण या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये १ ली ते ७ वी असे वर्ग पहिल्यापासूनच होते. त्याप्रमाणे १९९६ च्या जून महिन्यापासून गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराची एक भाग शाळा म्हणून या ठिकाणी इयत्ता ८ वीचा वर्ग सुरु केला. गुंजाळवाडी माध्यमिक शाळेची ही मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये गुंजाळवाडीचे ग्रामस्थ आणि ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे मुंबईचे श्री. शिवाजीराव बेलवटे यांची मोठी मदत झाली.
इ. स. १९९८-९९ पासून विद्यामंदिराच्या भाग शाळेऐवजी स्वतंत्र शाळा मिळावी म्हणून ग्रामस्थांच्या विनंतीप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाने शिक्षण विभागास प्रस्ताव पाठविला. शैक्षणिक वर्ष २००० पासून इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली. पहिल्या वर्षी शाळेची विद्यार्थी संख्या ८८ एवढी होती. आता शाळेचे नामकरण ‘ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी’ असे झाले. ८८ या विद्यार्थीसंख्येवरून यावर्षी विद्यार्थी संख्या सुमारे १५० वर पोहोचली आहे. स्टाफ ची संख्या : ४ उपशिक्षक, १ लिपिक व १ सेवक पहिली इयत्ता १० वी ची बॅच वर्ष २००२-०३ मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडली.
शैक्षणिक वर्ष २००३ पासून शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. सांस्कृतिक बाबींना चालना देत असताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये वकृत्व स्पर्धांचे आयोजन, विविध शाळांमध्ये सहभाग, थोर महापुरुषांची जयंती उत्सव, वाचन दिवस, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता मध्ये सहभाग आणि आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष २००९-२०१० पासून श्री. र. ब. वाघोले यांनी शाळेच्या मुख्याध्यापकापदाची सूत्रे हाती घेतली. याचवर्षी कु. ढवळे प्रियंका या विद्यार्थिनीस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे दरमहा ५०० रुपये इयत्ता आठवी पासून इयत्ता बारावी पर्यंत मिळाली. २०१२ मध्ये आणखी पाच विद्यार्थी या शिष्यवृत्तीस प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग, चित्रकला परीक्षांचे आयोजन, सहलींचे नियोजन केले जाते. या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे २०१२ पासून शाळेचा निकाल १००% लागला आहे.
शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री. समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे या ठिकाणी करण्यात आले होते, तेथे शिक्षक श्री. वाबळे यांनी तयार केलेल्या ‘चौकानाचे प्रकार’ या शोध प्रकल्पाला तालुकास्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाले.
वार्षिक क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेची कामगिरी उल्लेखनीय आहे. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग हे या शाळेचे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. दर वर्षी नेहमी होणाऱ्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी डॉक्टर अमोल कोल्हे, पोलीस अधिकारी श्री अरुण वायकर, श्री दिलीप भुजबळ इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व प्रोत्साहन आणि अनुभवी मेहेनती शिक्षक वर्ग इत्यादी घटकांमुळे शाळा प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.
जून १९९८
या माध्यमिक विद्यालयाची सुरुवात गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराची भागशाळा म्हणून १९९८ मध्ये झाली.
जून १९९९
स्वतंत्र शाळा म्हणून मान्यता मिळाली. ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी या नावाने शाळेची सुरुवात झाली.
Photo Gallery : काही क्षणचित्रे