सौ. सखुबाई उमाजी तांबे
पूर्व प्राथमिक विभागातील उत्तम शिक्षण, चांगले संस्कार याने प्रभावित होऊन श्री. शिवाजी उमाजी तांबे व सौ. अलका शिवाजी तांबे यांनी श्रीमती सखुबाई उमाजी तांबे यांचे स्मरणार्य शाळेस तीस लाख रुपये देणगी दिली आणि आता शाळेचे नाव श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन असे आहे.गुरुवर्य सबनीसांचा वसा पुढे चालवू!
बालकांच्या उन्नतीचा दीप सतत तेवत ठेवू!!
______________________
आमचा विद्यार्थी:
अभ्यासू
शिस्तप्रिय
संस्कारक्षम
कलागुणयुक्त
खिलाडू वृत्तीचा
शाळेविषयी माहिती:
गुरुवर्य नानासाहेब सबनीस यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ग्रामोन्नती मंडळाचा विस्तार निरनिराळ्या 21 शाखांमध्ये झालेला आहे. सन 1979 साली बालवाडी विभाग सुरू करण्यात आला अन् बघता बघता बहरत गेला. आज बालवाडी विभागासाठी स्वतंत्र इमारत उभी आहे. छोट्या मुलांच्या सोयीसुविधांचा विचार करणारी आपल्यासारखी संस्था जुन्नर तालुक्यातच नव्हे, तर पुढे जिल्ह्यातही अभावानेच आढळून येईल.
आज बालवाडी विभागात सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी छोटी टेबल-खुर्ची, छोटे नळ, उत्तम स्वच्छतागृह, लहान लहान पायऱ्या असा त्यांच्या उंचीचा, वयाचा विचार करून सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. प्रशिक्षित, बाल मानसशास्त्रानुसार मुलांशी वागणारा, ग्रामीण भागातील मुलांची तसेच पालकांचीही गरज ओळखून काम करणारा, उत्साही, आनंदी शिक्षकवृंद है शाळेचे वैशिष्टय. दरवर्षी शाळेतील शिक्षिकासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यामुळे शिक्षण पद्धतीतील बदलांशी जुळवून घेणे शिक्षिकांना सहज शक्य होते. कार्यक्षम मुख्याध्यापिका, तळमळीने शिकविणाऱ्या शिक्षिका, प्रेमळ सेवकवर्ग, त्यांना सतत मार्गदर्शन करणारे चेअरमन व ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी यांच्या व आपणा सर्वांच्या प्रयत्नाने आपण प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत.
आपले व आपल्या पाल्याचे पूर्व प्राथमिक विभागात सहर्ष स्वागत!
अशी आहे आपली शाळा:
उपक्रम:
प्रवेश :
शिशु गट वयोमर्यादा- तीन वर्षे ते तीन वर्षे अकरा महिने
लहान गट वयोमर्यादा- चार वर्षे ते चार वर्षे अकरा महिने
Photo Gallery :
ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन ( सेमी इंग्रजी माध्यम)
*शाळेविषयी अधिक माहिती*
Click hereही शाळा (बालनिकेतन) पूर्वी श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिर मध्ये पूर्व-प्राथमिक वर्गांचे स्वरुपात भरत होती. जून २०११ पासून तेथून पुर्व प्राथमिक विभाग वेगळा करण्यात आला. या विभागासाठी स्वतंत्र, प्रशस्त, जवळजवळ १ कोटी रूपये खर्चाची नवीन इमारत बांधण्यात आली. जून २०११ पासून शाळा नवीन इमारतीत भरते आहे.
१९४९ साली ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून पहिली बालवाडी सुरु झाली तेव्हा विद्यार्थी संख्या ५५ होती.
२०११ मधे नवीन इमारतीतील शाळेत ४१६ विद्यार्थी संख्या होती.
आता २०१९-२० मध्ये विद्यार्थी संख्या ५६७ आहे.
एकूण शिक्षिका १५, गाणे व नृत्य यासाठी 2 विषय शिक्षक, इंग्रजी विषयासाठी स्वतंत्र शिक्षिका
पूर्व प्राथमिक विभागातील उत्तम शिक्षण, चांगले संस्कार याने प्रभावित होऊन श्री. शिवाजी उमाजी तांबे व सौ. अलका शिवाजी तांबे यांनी श्रीमती सखुबाई उमाजी तांबे यांचे स्मरणार्य शाळेस तीस लाख रुपये देणगी दिली आणि आता शाळेचे नाव श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन असे आहे.
*मुख्याध्यापिका-
१९८४ मध्ये बालवाडी शिक्षिका म्हणून आपले काम सुरु केलेल्या सौ. मोहिनी ज्ञानेश्वर बेदरकर यांनी १९९९साली पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणुन जबाबदारी स्वीकारली. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मे २०१७ मध्ये त्या निवृत्त झाल्या.
जून १९९१ पासून सहशिक्षिका म्हणून रुजू झालेल्या सौ. अनघा अनिरुद्ध साने जून २०१७ पासून मुख्याध्यापिका म्हणून शाळेचे कामकाज पहात आहेत.
*विद्यार्थ्यांसाठी वेगळे काही-
सभाधीटपणा वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम.
परिसराची ओळख होण्यासाठी विविध उपक्रमांवर भर.
बालवाडीचा आत्मा असलेली गाणी - गोष्टी यांची शाळेने तयार केलेली शिक्षकांचा सहभाग असलेली संगीतमय सी.डी.
प्रोजेक्टर, कॉम्पुटर यांचा भरपूर वापर.
सर्व सण उत्सव शाळेत साजरे.
जिल्हास्तरावरील चित्रकला, नृत्य, नाटक अशा विविध स्पर्धामधे विद्यार्थ्यांचा सहभाग व परितोषिक प्राप्त.
*पालकांसाठी उपक्रम -
दर महिन्याला वर्गसभेचे व प्रत्येक सत्रात पालक सभेचे आयोजन.
पालकांसाठी वेगवेगळ्या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन.
दरवर्षी पालक शिक्षक संघ स्थापन.
महिला पालकांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम. स्नेहसंमेलन.
पावसाळी दिवस, पालक - विद्यार्थी - शिक्षक यांची अंगत पंगत है वैशिष्टयपूर्ण उपक्रम.
-- सौ अनघा साने, मुख्याध्यापिका
Contact : संपर्क : फोन : ०२१३२ २४४८४२
Email ID :