शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी. एड.) : कालक्रम
२००६-०८ :
शिक्षण शास्त्र महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनाकडे व NCTE कडे प्रस्ताव पाठवून शिक्षण शास्त्र महाविद्यालयाची मान्यता दीर्घ प्रयत्न करून चिकाटीने मिळवली. मा. अनिल मेहेर (कार्याध्यक्ष) व मा. रवींद्र पारगावकर (कार्यवाह) यांनी विशेष पाठपुरावा केला.
१ ऑगस्ट २००९ :
शिक्षण शास्त्र महाविद्यालय सुरू झाले
२००९-१४ :
१ वर्षाचा बी. एड. कोर्स राबविला. (१०० विद्यार्थी)
२०१५ :
२ वर्षाचा बी.एड. कोर्स सुरू झाला. (५० x २ = १०० विद्यार्थी)
२०१० :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शालेय व्यवस्थापन पदविका DSM कोर्स सुरू झाला
चेअरमन पद खालील पदाधिकाऱ्यांनी भूषविले :
प्राचार्य नामावली :
मान्यता क्रमांक वगैरे माहिती देणे आहे, सर्वच विभागांची
भावे सर फोटो, टाक फोटो, पादीर फोटो, gonge फोटो, कुलकर्णी फोटो
RN गायकवाड फोटो
YCMOU सुवर्ण महोत्सव फोटो सर्व विभाग ... कोनशीला सर्व वोभाग .... चेअरमन सर्व विभाग
ग्रामोन्नती मंडळाचा शिक्षण विस्तार होत असताना शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची आवश्यकता परिसरातून व्यक्त होऊ लागली. कारण जुन्नर परिसरात शिक्षक प्रशिक्षणासाठीचे अध्यापक महाविद्यालय नव्हते. ग्रामोन्नती मंडळाच्या व्यवस्थापनाच्या दूरदृष्टी नजरेतून ही बाब सुटली नाही. परिसरातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशामध्ये प्रवेश करावयाचा असेल तर 'बी.एड.' ची पदवी प्राप्त करणे अनिवार्य आहे. म्हणून ग्रामोन्नती मंडळाने दिनांक १ ऑगस्ट २००९ रोजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केले. यथायोग्य पद्धतीने विहित नियमांना अनुसरून, नियमांना बांधील राहून महाविद्यालयसाठीचा प्राध्यापक, इतर कर्मचारी वर्ग सूत्रबुद्ध नियोजनाने कामास लागला. या ठिकाणी केवळ अध्ययन-अध्यापन नव्हे विद्यार्थ्यांच्या सर्वकष गुणांना बहुविध पद्धतीने कशा प्रकारे चालना देऊन शैक्षणिक चेतना जागृत ठेवता येईल यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासावर भर देताना; तो समाजात एक व्यक्ती म्हणून, सक्षम नागरिक या नात्याने उभा करणे कसे शक्य आहे यासाठी आमचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कार्यरत आहेत.
समाजामध्ये उदयोन्मुख असा भावी शिक्षक, शिक्षकांची पिढी घडविण्याचे काम शिक्षकांकडून केले जाते. मात्र जे पिढी घडविणार आहेत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे असते; तेच काम येथे केले जाते. सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जोपासण्यासाठीच्या कृतिसत्रांची जोड प्रशिक्षणाला दिली जाते. भारतीय संविधानाने नमूद केलेले नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांना देण्यासाठी स्वतंत्र कृतिसत्र व तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जाते. अशाच कृतिसत्राचा भाग म्हणून शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये 'राज्यस्तरीय मूल्यमापन' आणि २०११-१२ मध्ये 'ज्ञानरचनावाद' या संकल्पनावर आधारित कार्यशाळा घेण्यात आल्या. आपल्या ज्ञानाचा इतर विद्याशाखांना कसा लाभ देता येईल; यासाठी पूर्व प्राथमिक विभागासाठी मेंदू विकासावर आधारित कृतिसत्र आयोजित करण्यात आले.
बी. एड. अभ्यासक्रमा समवेतच बी. एड. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ' शालेय व्यवस्थापन पदविका' हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मान्यता व संलग्नतेने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थी केली असून माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. आतापर्यंत शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रम पदविकेचा निकाल १००% लागला आहे. त्यात समवेत २०१५-१६ पासून दोन वर्षांचा जर्मन भाषा शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी जर्मनीतील प्रगत शिक्षण संस्था (KAIZEN LINGUA PVT. LTD) या संस्थेशी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आपआपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन शैक्षणिक परिषदा चर्चासत्रामध्ये भाग घेतला आहे.