काही ऐतिहासिक क्षण :
Dr. Ram explaining the importance of organic farming
गुरुवर्य नानासाहेब तथा राजाराम परशुराम सबनीस यांच्या संकल्पनेमधील ' शेतीशाळा' म्हणजे आपले कृषी संकुल होय. नानांनी शेती-शिक्षणाची गरज ओळखून विद्यमान रा. प. सबनीस विद्यामंदिरास (मूळची शेती शाळा )' शेती शाळा' अशीच मान्यता मिळविली होती. महात्मा गांधींच्या 'मुलोद्यागी शिक्षण' पद्धतीचा मूलमंत्र घेऊन पुणे शहरांमधून नानांनी जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवेश केला. आजच्या जुन्नरमधून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. १९४४ मध्ये वारूळवाडी परिसरामधील ज्ञानतपस्वी विद्वत दृष्टीने भारलेल्या मेहेर, वारुळे, बनकर, पाटे या परिवारासमवेत नानांनी ग्रामोन्नती मंडळाची स्थापना केली.
शेती शाळेची मान्यता मिळण्यासाठी शाळेस स्वतःची जमीन असणे अनिवार्य असते. त्यावेळी नानांचे विश्वासू सहकारी व ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ यांनी पुढाकार घेऊन १९५२ मध्ये आपल्या मातोश्री जिजाबाई भुजबळ यांच्या स्मरणार्थ १६ एकर ६ गुंठे जमीन देणगी म्हणून दिली.
गुरुवर्य नानांचे मुख्य प्रतिपादन शेती शिक्षणावर आधारलेले होते. केवळ शेतीवर अवलंबून न राहता तिला जोडधंद्याची जोड द्यावी हा विचार त्यांनी १९४४ मध्ये मांडला. नानांच्या या विचारास मूर्त रूप देऊन पुढे ग्रामोन्नती मंडळ स्वतंत्रपणे ' विद्यामंदिर शेती विभाग' सुरू केला. १९४४ ते १९६० या सोळा वर्षांमध्ये ग्रामोन्नती मंडळ, स्वतः नाना आणि पदाधिकारी विशेषत: बाळकृष्ण बनकर, नंदाराम शेठमल मुथ्था, मुलचंद कोठारी, अदत्त चिंतामणी, उमाजीशेठ तांबे व इतर प्रतिष्ठित आणि शिक्षण प्रेमींनी शिक्षण क्षेत्रामध्ये नावारुपास आलेली शाळा उभी केली. गुरुवर्यांनी शेतीविषयक, सास्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रम सुरू केले.
इ.स. १९५१ मध्ये शेती विषय अभ्यासक्रमांमध्ये आला. तत्पूर्वी १९४४ मध्ये नानांनी ग्रामोन्नती मंडळात शेतीची प्रात्यक्षिके करण्यास सुरुवात केली होती. शेती विभागासाठी जुन्नर तालुक्याचे तत्कालीन मामलेदार एस. जी. माने यांनी संपूर्ण तालुक्यामधून ३००००/- (तीस हजार रुपये) निधी जमून शेतीसाठी नानांच्या स्वाधीन केला. त्यातून नाना व सहकाऱ्यांनी निर्माण केलेली ही ग्रामीण भागातील ' कृषी आश्रम शाळा' उभारली. त्यावेळी हा प्रयोग एवढा अभिनव होता की, अनेक मान्यवर ही शाळा पाहण्यासाठी येत असत. नानांच्या कृषी शाळेचा हा वारसा श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ या कृषी संकुलाने आजवर टिकविला आहे.
या विभागाची धुरा सांभाळण्यामध्ये मा. भालचंद्र बनकर, डॉ. म. ना. डांगे, मा. कृष्णाजी मेहेर, मा. अनिलतात्या मेहेर, श्री भीमरावजी खैरे, श्री. श. म. ठुसे, सु. को. भोर आणि श्री. ब. त. पडवळ यांनी स्वतःचा अमूल्य वेळ आणि आर्थिक योगदानही दिले आहे
शेतीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने व व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'बहुवर्षायू' बागांतर्गत चिक्कू, आंबा, डाळिंब, सिताफळ, बोर इत्यादी फळझाडांची लागवड तर भाजीपाला, फुलझाडे व कडधान्ये इत्यादीचे उत्पन्न घेतले जाऊ लागले.
शेतीमध्ये लागवड करण्यासाठी अन्य ठिकाणाहून रोपे आणणे आर्थिक दृष्ट्या परवडणारी बाब नव्हती. म्हणून रोपवाटिका उद्योग उभारण्याचे ठरविले महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाची मान्यता घेऊन शासकीय मान्यताप्राप्त खाजगी रोपवाटिका हा प्रकल्प साकारला. ज्यामधून वार्षिक 28 ते 30 हजार रोपांची निर्मिती केली ती अव्याहतपणे चालू आहेत. रोप यांमध्ये प्रामुख्याने बांबू, निलगिरी, सीताफळ, अशोक, आंबा, नारळ आणि तुती इत्यादीचा समावेश आहे. या विभागाचा उपयोग माळी प्रशिक्षण वर्गाच्या विद्यार्थ्यांना कलमे करणे, रोपांची निगा शोभिवंत झाडांची लागवड यासाठी होत आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान पदविका फुल शेती उत्पादन पदविका यासाठी होत आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान पदविका, फुल शेती उत्पादन पदविका या अभ्यासक्रमातील विद्यार्थी येथे प्रात्यक्षिक करीत आहेत. रा. प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाच्या किमान कौशल्यावर आधारित हॉर्टिकल्चर अभ्यासक्रमासाठी या विभागांमध्ये सर्व प्रात्याक्षिकेमाळी प्रशिक्षण वर्ग
मंडळाच्या रोपवाटिकेमध्ये उपलब्ध मातृवृक्ष व पायाभूत सुविधा यांच्या दोरावर श्री. कृ. चि. मेहेर, श्री अनंतराव कुलकर्णी, श्री म.ना. डांगे श्री अ. घ. मेहेर ज्यांच्या दूरदृष्टीतून आणि विशेष प्रयत्नांमधून इ. स. 1991-92 या वर्षी 'महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी' यांच्या संलग्नेतेने व मान्यतेने एक वर्षाचा 'माळी प्रशिक्षण वर्ग' हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी 38 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. हीच ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षणाची औपचारिक सुरुवात होय.
माळी प्रशिक्षण वर्ग अभ्यासक्रमाला मान्यता देताना दोन लाख रुपये सुरक्षा ठेव विद्यापीठाकडे जमा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते अभ्यासक्रमाची फी रु. 700/- असताना 2 लाख रुपये डिपॉझिट कसे शक्य आहे? असा प्रश्न निर्माण झाला त्याचवेळीही मा. श्री. अ. घ. मेहेर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दोरगे यांच्याकडे पाठपुरावा केला गेला आणि तसा प्रस्ताव कार्यकारीपरिषदेमध्ये मंजूर करून कृषी शिक्षण परिषद पुणे यांचे कडेही मंजूर करून घेण्यात आला त्यामुळेच या अभ्यासक्रमाला कोणते डिपॉझिट किंवा बँक गॅरंटी न घेता मान्यता दिली गेली.
या अभ्यासक्रमाची दखल मुंबई दूरदर्शन विभागाने घेतली. दूरदर्शन विभागाचे संचालक शिवाजीराव फुलसुंदर यांनी या विभागाची स्वतंत्र चित्रफित तयार करून 'आमची माती आमची माणसे' या कार्यक्रमामध्ये 'विकासाची वाटचाल' या सदरात प्रदर्शित केली. या प्रशिक्षण विभागाचे नामकरण "श्री वाहन महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ माळी प्रशिक्षण केंद्र" असे करण्यात आले. प्रशिक्षण घेणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी डॉ. भि. गो. भुजबळ व मा. रत्नपारखी साहेब यांच्या प्रयत्नांमधून भारत पल्व्हरायझिंग कृषी संशोधन व विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून दरमहा 60/- विद्यावेतन देण्यात आले होते. या शिष्यवृत्ती वरच बरेच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आज चांगल्या ठिकाणी काम करतात
पाणी टंचाईवर मात
इ. स. १९३३ मध्ये पाऊस कमी झाल्याने जुन्नर परिसरात व शेतीसाठी पाणी टंचाई जाणवू लागली. त्यावेळी तात्यासाहेब भुजबळ यांचे नातू आणि ग्रामोन्नती मंडळाच्या शेती विभागाचे विद्यमान प्रमुख मा. श्री. रत्नदीप भरविरकर त्यांनी उदार अंतकरणाने 10 सप्टेंबर 1993 रोजी म्हणजे मा. माझ्या साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्ताने 10000/- देणगी देऊन विभागासाठी स्वतंत्र बोअरवेल घेण्याची कल्पना मांडली. त्यावेळी मा. श्री. अनिल तात्या मेहेर यांच्या प्रयत्नातून मा. श्री. जयराम शेठ लांडगे यांनी पाण्याचा पॉईंट दिला आणि त्याला पाणी व्यवस्थित लागले. अशाप्रकारे पाणीटंचाईवर मात करून हे भगीरथाचे काम या दानशूर कुटुंबाने समाज हितासाठी त्यांच्यानंतरही अविरत चालू ठेवले आहे
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि दखल घेतली
शैक्षणिक वर्ष १९९३-९४ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान या विद्याशाखेचे संचालक मा. डॉ. सूर्या गुंजाळ यांनी कृषी प्रशिक्षण केंद्राची प्रगती पाहून कृषी अभ्यासकेंद्राची मान्यता दिली. त्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना दूरस्थ पद्धतीने कृषी शिक्षण घेण्याचा मार्ग सापडला. शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर गेल्या विद्यार्थ्याला त्याच्या दैनंदिन अर्थार्जनाच्या व्यवसाय/ नोकरी करता करता शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ग्रामोन्नती मंडळाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे अंतर्गत मुक्त कृषी शिक्षण केंद्राची उभारणी केली. याअंतर्गत अनिलतात्या मेहेर यांनी परिश्रम पूर्वक प्रयत्न केले आणि आणि केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज हे केंद्र राज्यात प्रमुख तीन केंद्रामध्ये आहे. तसेच केंद्राच्या केंद्र संचालक पदाची धुरा श्री. बी. आर. भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या आयोजनामुळे आज ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याच्या व्रताला आपण हातभार लावू शकलो.
काही विद्यार्थ्यांनी (ही नावे केवळ उदाहरणासाठी) उदा. सिद्धेश जगताप, त्रिंबक टकले, दिपाली रसाळ, अश्विनी राऊत, रोहित दौंडकर यांनी नेत्रदीपक यश संपादन केले तर ज्ञानेश्वरी लांडे ही विद्यार्थिनी बी.एससी. ऍग्री. परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आली. महाराष्ट्र सरकार तर्फे मा. गिरीश महाजन व दीपक केसरकर या मंत्री मोहन यांच्या उपस्थित ज्ञानेश्वरी सुवर्णपदक प्रदान केले. ही ग्रामोन्नती मंडळासाठी खरोखरच गर्वाची बाब आहे. आज ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण केंद्रांमध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या मुक्त कृषी शिक्षण केंद्राची गणना केली जाते.
मा. राज्यपाल भेट
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल मा. डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी कृषी संकुलास भेट दिली. कृषी शिक्षणाच्या प्रवेश द्वाराजवळ त्यांच्या हस्ते लागवड केलेला ख्रिसमस ट्री आजही दिमाखत डोलत आहे.
कृषी पदविका विद्यालयाची मुहूर्तमेढ
कृषी विभागाच्या प्रगतीकडे वाटचाल चालू असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी त्यांनी 1995 मध्ये मराठी माध्यमातील शेतीशाळा (कृषी पदविका विद्यालय) सुरु करण्यात मान्यता दिली. कृषी शिक्षणाच्या क्षेत्रात हा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या उपस्थितीत कृषी संकुलासाठी च्या अध्यावत इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. आज ही वास्तू तयार होऊन एकाच इमारतीमध्ये सर्वच कृषी शाखांच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे.
पशुसंवर्धन विभाग
भारतीय शेती आणि पशुधन यांचे एकात्म नाते आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली तर शेतकऱ्यास रोख रक्कम मिळते. भांडवलाच्या उपलब्ध समवेतच शेतीत सेंद्रिय खताची उपलब्धता होते. जुन्नर तालुक्यामध्ये दुग्धव्यवसाय आणि पशुपालनास मोठा वाव आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावेल ग्रामोन्नती मंडळास या परिस्थितीची जाणीव होती. मनोज महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडे पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा केला. इ. स. 2002 जून महिन्यामध्ये दोन वर्षे कालावधीचा मराठी माध्यमांमध्ये शिकविला जाणारा "दुग्ध व्यवसाय व्यवस्थान आणि पशुसंवर्धन पदविका" हा अभ्यासक्रम सुरू झाला.
पूर्वी सरकारी दवाखान्यामध्ये सहाय्यक पदासाठी पशुधन पर्यवेक्षक L.S.S. (Live Stock Supervisor) नावाने एक वर्ष कालावधीचा प्रात्यक्षिक आधारित अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांमध्ये चालविला जात होता. परंतु सन 1998 मध्ये पशुविज्ञानासाठी स्वतंत्र विद्यापीठ नागपूर येथे स्थापन झाले आणि हा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांनी या विद्यापीठाकडे वर्ग केला. त्यानंतरही ग्रामीण पशुअर्थकारणाचा कणा म्हणून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी येत. परंतु महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफूस) यांनी काही तांत्रिक कारणामुळे यामधून पशू प्रजनन, भिषक शास्त्र यासारखे तांत्रिक विषय काढावे लागले त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी ओढा रोडावला व विद्यार्थी नसल्यामुळे बहुतेक डेअरी डिप्लोमा विद्यालये बंद पडली.
आपल्या विद्यालयालाही विद्यापीठाने तसे पत्र पाठवले. परंतु मान्यता रद्द होणे ही बाब पचनी पडणारी नव्हती. त्यामुळे मा. श्री. अ. घ. मेहेर यांनी तात्कालीन पशुसंवर्धन आयुक्त व प्रभारी कुलगुरू मा. श्री. झगडे यांची भेट घेतली आणि मान्यता चालू ठेवण्याची विनंती केली. आज त्याच मान्यतेमुळे हा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने पुनर्जीवित करणे आपल्याला शक्य झाले. आज परिसरात शेकडो विद्यार्थी या अभ्यासक्रमामुळे स्वयंरोजगार करीत आहे.
कृषी बाजार समिती केंद्र
इ. स. 2009 मध्ये कृषी पदविकेचे नामांतर "कृषी तंत्र पदविका" असे करून त्यामध्ये सेंद्रिय शेती, कृषी अवजारे, यंत्रे व आधुनिक सिंचन, शेतमाल/विक्री प्रक्रिया, सहकार व पणन अशा नूतन, मात्र बदलत्या काळाचा वेध घेणाऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला. शेतमाल विक्री प्रक्रिया समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संपर्क असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी तो कृषी बाजार समितीमध्ये जाईल असे नव्हे. मात्र शेतकऱ्यांची मुलेच विद्यार्थी म्हणून कृषी संकुलात शिक्षण घेत असल्याने त्याला जर बाजाराची माहिती अद्ययावत पणे मिळाली तरी काम भागणार होते. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली व "कृषी बाजार माहिती केंद्र" कृषी संकुलात सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला.
माहिती तंत्रज्ञानाचा फारसा बोलबाला नसताना ज्या वेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेती मालाचे बाजारभाव मिळावेत यासाठी जुन्नर तालुक्यात बाजार माहिती केंद्र द्यायचे ठरविले. त्यावेळी तालुक्यातून दोन प्रस्ताव होते. तत्कालीन कृषी आयुक्त डॉ. सुधीरकुमार गोयल जाने दोन्ही संस्थांना आयुक्तालयात पाचारण केले. त्या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे काम आणि शेतकऱ्यांप्रती असणारा जिव्हाळा यामुळे रुपये एक लाख अनुदान देऊन ग्रामोन्नती मंडळाला बाजार माहिती केंद्रासाठी संगणक, प्रिंटर, इंटरनेट व शासकीय साहित्य उपलब्ध करून दिले. त्यावेळी कृषी क्षेत्रांमधील संस्थेचे कार्य समर्पक आणि समर्थपणे मांडण्याचे काम अनिलतात्या मेहेर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. माजी केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरद चंद्रजी पवार, फलोत्पादन व पाटबंधारे मंत्री नामदार अजितदादा पवार, पिक्चर शिक्षणमंत्री प्रा. लक्ष्मण रावजी ढोबळे, ऊर्जा व तंत्र शिक्षण मंत्री मा. दिलीप रावजी वळसे-पाटील, खेड लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. श्री. अशोकराव मोहोळ, माजी खासदार निवृत्तीशेठ शेरकर, जुन्नर तालुक्याचे आमदार मा. श्री. बाळासाहेब दांगट माजी आमदार मा. श्री. वल्लभशेठ बनके यांच्या हस्ते या माहिती केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. अशाप्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये कृषी शिक्षणासमवेतच बदलते आधुनिक तंत्रज्ञान विश्वासाने सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र म्हणून कृषी केंद्राची प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे बांधावरचा शेतकरी माहिती केंद्रापर्यंत आला.
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
सामान्य शेतकऱ्यांपर्यंत थेट बांधावरच पोहोचून त्यांना पिकावरील जैविक कीड नियंत्रण, सेंद्रिय शेती प्रकल्प आणि कृषी प्रदर्शने इत्यादी प्रात्यक्षिके खेड्यापाड्यात जाऊन आयोजित केले जाऊ लागले. आजच्या इंटरनेट आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शून्य ऊर्जा शीतगृह, हवामानाचा अभ्यास, औषधी वनस्पतींचा संग्रह व उपयुक्तता, पशुसंवर्धनातील मिल्किंग मशिनचा वापर इत्यादी क्षेत्रांमध्ये कृषी संकुलातील प्राध्यापक सेवक वर्ग सदैव तत्पर असतात. त्यासाठी मिटकॉन व इतर प्रगत तंत्र प्रशिक्षण संस्थांची मदत घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी बायोडायनॅमिक शेती तंत्रज्ञान, होमा फर्मिंग इत्यादी तंत्रज्ञानाचा प्रशिक्षणासाठी डॉ. एडवर्ड जॉन्सन यांसारख्या परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जाते.
कृषी तंत्रज्ञानाची पदविका
इ. स. 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषि धोरणानुसार कृषी तंत्रज्ञान पदविका या अभ्यासक्रमांतर्गत "ॲग्री पॉलिटेक्निक" या कोर्ससाठी बांधला देण्यात आली. या घडामोडी मागेही ग्रामोन्नती मंडळाचा मोलाचा सहभाग आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत पूर्वी चालविला जाणारा कृषी पदविका या अभ्यासक्रमाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण ग्रामसेवक या पदासाठी समाजशास्त्र पदवी, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला अपात्र ठरविणारा हा शासन निर्णय 2011 मध्ये झाला व कृषी शिक्षण अभ्यासक्रमात खळबळ उडाली. त्या वेळी ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व संचालकांनी मा. कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या नेतृत्वाखाली तात्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सद्य स्थितीची जाणीव करून दिली. त्यावेळी कृषी पदविकेचा अभ्यासक्रमामध्ये बदल करून नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय झाला आणि या बाबतीत पाठपुरावा करण्यासाठी अनिल टाटा यांच्या नेतृत्वात समिती गठीत झाली. यामध्ये विजयराव कोलते, शिवाजीराव पोखरकर, उत्तमराव कांबळे यांनी एकत्रितपणे कृषी शिक्षणामध्ये प्रथमच तीन वर्षे सेमी इंग्रजी अभ्यासक्रम तयार केला आणि कृषी शिक्षण परिषद, पुणे यांचे मान्यतेनंतर तत्कालीन मा. कृषिमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यावर सखोल चर्चा आणि विचार मंथन करून शासनाने कृषी विद्यापीठांना अभ्यासक्रम न देता सक्षम खाजगी संस्थांना दिला. ही भूमिका शासकीय पातळीवर पटवून देण्याबाबत ज्या व्यक्तीने प्रमुख भूमिका बजावली त्यामध्ये राजेंद्र पवार (बारामती), अनिलतात्या मेहेर (नारायणगाव) यांचा सिंहाचा वाटा आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठाच्या पातळीवर प्रचंड नाराजी तयार झाली. परंतु तरीही आज राज्यात 54 कृषी तंत्र निकेतन सक्षम पणे सुरु असून प्रति वर्षी 2500 विद्यार्थी कृषी पदवीसाठी विविध महाविद्यालय प्रवेश घेऊ शकतात. या ऐतिहासिक लढाईत ग्रामोन्नती मंडळाचाही महत्त्वपूर्ण वाटा असून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या दारापर्यंत आणून सोडल्याचे मोठे समाधान आहे.
ग्रामोन्नती मंडळाने या क्षेत्रात पुढाकार घेऊन एग्रीकल्चर पॉलिटेक्निक क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेतली की, या कामी विद्यार्थ्यांचे योगदान अर्थपूर्ण आहे. सन 2014 मध्ये ॲग्री पॉलिटेक्निक बाबत अभ्यासक्रम सुधारणा असोत, फी बाबत निर्णय असोत किंवा शासन निर्णय असो. कृषी शिक्षणामध्ये ज्यांचा शब्द विद्यापीठात नव्हे तर शासन पातळीवरही प्रमाण मानला जात आहे. हे नाव म्हणजे कृषिरत्न अनिलतात्या मेहेर. नवीन युती शासनाने 2014 मध्ये कृषी तंत्रज्ञान पदविकेचे विद्यार्थी (बी.एससी. ऍग्री कृषी पदवी) साठी अपात्र ठरविणारा एक अचानक शासननिर्णय केला. ज्यामुळे पुन्हा या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले यामध्येही अनिलतात्या मेहेर, डॉ. पोखरकर, आमदार विखे, अा. राहुल पाटील यांनी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांची भेट घेतली आणि या विषयावर तातडीने शिक्षण प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांची नेमणूक करून मोठा संघर्ष करून केवळ 18 दिवसांत पुन्हा शासन निर्णय बदलूनच सुटकेचा निःश्वास सोडला
दरम्यानच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजयराव मुंढे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या भेटी घेऊन गंभीरपणे या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे आज या अभ्यासक्रमाला सक्षम पाठबळ मिळाले असून त्यासाठी मा. अनिल तात्या मेहेर यांच्या शब्दांमुळेच आज ही राज्याच्या कृषी शिक्षण धोरणाची दिशा ठरत आहे याबद्दल शंका नाही.
कृषी परिषद
कृषी शिक्षण असो किंवा पशुधन अभ्यासक्रम ग्रामोन्नती मंडळाने विद्यापीठाच्या विविध परिषदा आयोजित केल्या आहेत. कृषी पदविका अभ्यासक्रमाची सर्व संस्थाचालक, प्राचार्य व विद्यापीठ प्रतिनिधी यांची संयुक्त परिषद नारायणगाव येथे घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले यासाठी विद्यापीठाने दहा हजार रुपये अनुदान दिले होते.
2015 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचेही एकदिवसीय चर्चासत्र मा. आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अध्यक्षतेखाली व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण निनावे त्यांच्यासमवेत राज्यातील सर्व संस्थाचालक आणि प्राचार्य यांचे साठी आयोजित केले होते. त्याचाही लाभ होऊन पुढे (Veternary Council of India V.C.I) कडे पाठपुरावा करून कृतीम रेतन व पशु प्रथमोपचार हे विषय पुन्हा समाविष्ट करण्यात आले व हा अभ्यासक्रम काही अंशी का होईना पशुपालकांच्या फायद्याचा होण्यासाठी मदत झाली. यामुळेच हा अभ्यासक्रम पुन्हा पुनर्जीवित झाला.
पूल उभारणी
ग्रामोन्नती मंडळाचे वसुंधरा फारम हे प्रक्षेत्र डिंभे डावा कालवा गेल्या दोन भागात विभागले गेले. त्यामुळे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी तंत्र निकेतन व कृषी विज्ञान केंद्र विज्ञान केंद्र यांना या प्रक्षेत्रावर जाण्यासाठी फुलाची नितांत गरज होती. त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. वल्लभ शेठ बेनके, जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांचेकडे मोठा पाठपुरावा करून तीन मीटर रुंदीचा पूल मंजूर करण्यासाठी मा. अनिल तात्या मेहेर व पदाधिकारी यांना मोठा पाठपुरावा केला व आज वसुंधरा कृषी सारखे मोठे कृषी प्रदर्शन आपण या या प्रक्षेत्रावर घेऊ शकलो. आज या पुलामुळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र मुख्य महामार्गाला पक्क्या रस्त्याने जोडले गेले आणि शेतकरी बंधू विनासायास प्रक्षेत्रावरील संशोधन पाहण्यासाठी थेट पोहोचू शकतो.
आमची शेती, आमचे शेतकरी- विशेष प्रात्यक्षिक उपक्रम
श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेतकरी व शेतकऱ्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी तंत्र निकेतनचे मा. प्राचार्य श्री. राधाकृष्ण गायकवाड यांच्या संकल्पनेतून 'आमची शेती, आमचे शेतकरी' हा विशेष उपक्रम राबविण्यात येतो. ज्या पद्धतीने B.Sc. Agri या अभ्यासक्रमांमध्ये कृषी पदवीसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) हा उपक्रम समाविष्ट असतो. यामुळे पदवीधारक विद्यार्थ्यांना शेतीचा अभ्यास करता येतो. ही उणीव पदविका अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि वेळेची मर्यादा विचारात घेता एक आठवडा मुदतीचा सुसंगत कार्यक्रम 'आमची शेती, आमचे शेतकरी' या उपक्रमाअंतर्गत राबविला जातो. या उपक्रमामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी गटागटाने प्रगतशील शेतकऱ्याची माहिती संकलित करणे व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरच्या शेती तंत्रज्ञान आधारित माहिती गोळा करणे असे ठरवण्यात आले. तर तृतीय वर्ष आणि पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका साठी कृषी पूरक उद्योग ही संकल्पना देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कृषीविषयक ज्ञानामध्ये वृद्धी करणे आणि त्याचा शेतीमध्ये वापर करणे. विद्यार्थी स्वयंअध्ययन करण्यासाठी तयार करणे. नेतृत्वगुणांना वाव प्रयत्न करणे. अहवाल लेखन ( Report Writing) बाबत माहिती देणे. सभा नियोजन, स्टेज डेअरिंग वाढविणे सांघिक क्षमता (Team Work) बाबत अधिक सक्षम करणे. विद्यार्थी व स्टाफ यांना कार्यक्षम प्रोत्साहन देणे. ही या उपक्रमाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. विद्यार्थ्यांनी साकारलेला "आमची शेती, आमचे शेतकरी" असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाची दखल घेऊन म. फु. कृ. वि. विद्यापीठ राहुरीचे कृषी अधिष्ठाता डॉ. दादाभाऊ यादव यांनी विद्यार्थ्यांना पाठीवर थाप देऊन गौरविले. या उपक्रमाबाबत मा. कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनीही भरभरून कौतुक केले.
शारीरिक शिक्षण व जिमखाना विभाग
कृषी शिक्षण संकुलामध्ये आज वाढत जाणारी विद्यार्थी संख्या विचारात घेता त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासासाठीही संस्था कटिबद्ध आहे. या अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यासाठी उत्तमोत्तम खेळाडू तयार करण्यासाठी वर्षभर विशेष प्रयत्न केले जातात. जिल्हा क्रीडा संचालनालय, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सन .... यावर्षी अत्याधुनिक उपक्रमाने सुसज्ज व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. यामध्ये एका वेळी 12 ते 15 विद्यार्थी व्यायाम करू शकतील अशी व्यवस्था आहे. या विभागाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मी कृषी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. दादाभाऊ यादव यांचे शुभहस्ते करण्यात आले. या विभागासाठी मा. श्री. पी. एच. नरसुडे, श्री. काशिद यांचे विशेष मार्गदर्शन मिळत असते.
केवळ 38 विद्यार्थ्यांना समवेत घेऊन सुरू झालेल्या कृषी संकुलाच्या विविध शाखांमध्ये आज 760 विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिक्षण घेत आहेत. गुरुवर्यांची शेतीविषयक दूरगामी दृष्टी, तात्यासाहेबांची दातृत्वशैली कृषिरत्न मा. श्री. अनिलतात्या मेहेर व मा. श्री. रत्नदीप भरविरकर यांचे मार्गदर्शन आणि मागील 26 वर्षापासूनचे प्रा. बी. आर. भुजबळ यांचे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच सूक्ष्म व्यवस्थापन कौशल्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे योगदान या सर्व घटकावर कृषी संकुलाची वाटचाल आश्वासकपणे चालू आहे. आज हे कृषी शिक्षण संकुल परिसरातील शेतकरी बांधवांसाठी " मिनी कृषि विद्यापीठ" ठरत आहे. अशी आश्वासक भूमिका तालुक्याच्या कृषी विकासात बजावणाऱ्या ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी यांचे बहुमूल्य योगदान वरच हा विभाग उत्तरोत्तर प्रगती करत आहे
कृषी परिषद
कृषी शिक्षण असो किंवा पशुधन अभ्यासक्रम ग्रामोन्नती मंडळाने विद्यापीठाच्या विविध परिषदा आयोजित केल्या आहेत. कृषी पदविका अभ्यासक्रमाची सर्व संस्थाचालक, प्राचार्य व विद्यापीठ प्रतिनिधी यांची संयुक्त परिषद नारायणगाव येथे घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले यासाठी विद्यापीठाने दहा हजार रुपये अनुदान दिले होते.
2015 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचेही एकदिवसीय चर्चासत्र मा. आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अध्यक्षतेखाली व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण निनावे त्यांच्यासमवेत राज्यातील सर्व संस्थाचालक आणि प्राचार्य यांचे साठी आयोजित केले होते. त्याचाही लाभ होऊन पुढे (Veternary Council of India V.C.I) कडे पाठपुरावा करून कृतीम रेतन व पशु प्रथमोपचार हे विषय पुन्हा समाविष्ट करण्यात आले व हा अभ्यासक्रम काही अंशी का होईना पशुपालकांच्या फायद्याचा होण्यासाठी मदत झाली. यामुळेच हा अभ्यासक्रम पुन्हा पुनर्जीवित झाला.
पूल उभारणी
ग्रामोन्नती मंडळाचे वसुंधरा फारम हे प्रक्षेत्र डिंभे डावा कालवा गेल्या दोन भागात विभागले गेले. त्यामुळे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी तंत्र निकेतन व कृषी विज्ञान केंद्र विज्ञान केंद्र यांना या प्रक्षेत्रावर जाण्यासाठी फुलाची नितांत गरज होती. त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. वल्लभ शेठ बेनके, जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांचेकडे मोठा पाठपुरावा करून तीन मीटर रुंदीचा पूल मंजूर करण्यासाठी मा. अनिल तात्या मेहेर व पदाधिकारी यांना मोठा पाठपुरावा केला व आज वसुंधरा कृषी सारखे मोठे कृषी प्रदर्शन आपण या या प्रक्षेत्रावर घेऊ शकलो. आज या पुलामुळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र मुख्य महामार्गाला पक्क्या रस्त्याने जोडले गेले आणि शेतकरी बंधू विनासायास प्रक्षेत्रावरील संशोधन पाहण्यासाठी थेट पोहोचू शकतो.
आमची शेती, आमचे शेतकरी- विशेष प्रात्यक्षिक उपक्रम
श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शेतकरी व शेतकऱ्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी तंत्र निकेतनचे मा. प्राचार्य श्री. राधाकृष्ण गायकवाड यांच्या संकल्पनेतून 'आमची शेती, आमचे शेतकरी' हा विशेष उपक्रम राबविण्यात येतो. ज्या पद्धतीने B.Sc. Agri या अभ्यासक्रमांमध्ये कृषी पदवीसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) हा उपक्रम समाविष्ट असतो. यामुळे पदवीधारक विद्यार्थ्यांना शेतीचा अभ्यास करता येतो. ही उणीव पदविका अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि वेळेची मर्यादा विचारात घेता एक आठवडा मुदतीचा सुसंगत कार्यक्रम 'आमची शेती, आमचे शेतकरी' या उपक्रमाअंतर्गत राबविला जातो. या उपक्रमामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी गटागटाने प्रगतशील शेतकऱ्याची माहिती संकलित करणे व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरच्या शेती तंत्रज्ञान आधारित माहिती गोळा करणे असे ठरवण्यात आले. तर तृतीय वर्ष आणि पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका साठी कृषी पूरक उद्योग ही संकल्पना देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कृषीविषयक ज्ञानामध्ये वृद्धी करणे आणि त्याचा शेतीमध्ये वापर करणे. विद्यार्थी स्वयंअध्ययन करण्यासाठी तयार करणे. नेतृत्वगुणांना वाव प्रयत्न करणे. अहवाल लेखन ( Report Writing) बाबत माहिती देणे. सभा नियोजन, स्टेज डेअरिंग वाढविणे सांघिक क्षमता (Team Work) बाबत अधिक सक्षम करणे. विद्यार्थी व स्टाफ यांना कार्यक्षम प्रोत्साहन देणे. ही या उपक्रमाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. विद्यार्थ्यांनी साकारलेला "आमची शेती, आमचे शेतकरी" असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाची दखल घेऊन म. फु. कृ. वि. विद्यापीठ राहुरीचे कृषी अधिष्ठाता डॉ. दादाभाऊ यादव यांनी विद्यार्थ्यांना पाठीवर थाप देऊन गौरविले. या उपक्रमाबाबत मा. कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनीही भरभरून कौतुक केले.
शारीरिक शिक्षण व जिमखाना विभाग
कृषी शिक्षण संकुलामध्ये आज वाढत जाणारी विद्यार्थी संख्या विचारात घेता त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासासाठीही संस्था कटिबद्ध आहे. या अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यासाठी उत्तमोत्तम खेळाडू तयार करण्यासाठी वर्षभर विशेष प्रयत्न केले जातात. जिल्हा क्रीडा संचालनालय, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सन .... यावर्षी अत्याधुनिक उपक्रमाने सुसज्ज व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. यामध्ये एका वेळी 12 ते 15 विद्यार्थी व्यायाम करू शकतील अशी व्यवस्था आहे. या विभागाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मी कृषी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. दादाभाऊ यादव यांचे शुभहस्ते करण्यात आले. या विभागासाठी मा. श्री. पी. एच. नरसुडे, श्री. काशिद यांचे विशेष मार्गदर्शन मिळत असते.
केवळ 38 विद्यार्थ्यांना समवेत घेऊन सुरू झालेल्या कृषी संकुलाच्या विविध शाखांमध्ये आज 760 विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिक्षण घेत आहेत. गुरुवर्यांची शेतीविषयक दूरगामी दृष्टी, तात्यासाहेबांची दातृत्वशैली कृषिरत्न मा. श्री. अनिलतात्या मेहेर व मा. श्री. रत्नदीप भरविरकर यांचे मार्गदर्शन आणि मागील 26 वर्षापासूनचे प्रा. बी. आर. भुजबळ यांचे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच सूक्ष्म व्यवस्थापन कौशल्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे योगदान या सर्व घटकावर कृषी संकुलाची वाटचाल आश्वासकपणे चालू आहे. आज हे कृषी शिक्षण संकुल परिसरातील शेतकरी बांधवांसाठी " मिनी कृषि विद्यापीठ" ठरत आहे. अशी आश्वासक भूमिका तालुक्याच्या कृषी विकासात बजावणाऱ्या ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी यांचे बहुमूल्य योगदान वरच हा विभाग उत्तरोत्तर प्रगती करत आहे.