यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सन 1995 पासून विद्यामंदिरामध्ये सुरू आहे. काही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहिस्थ शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने ग्रामोन्नती मंडळाने अभ्यासकेंद्र सुरू केले.
अभ्यास केंद्रांमधून पूर्वतयारी बी.ए. व बी.कॉम. या शिक्षण क्रमांकासाठी दरवर्षी साधारणपणे सहाशे ते सातशे विद्यार्थी प्रवेश घेत असतात. अभ्यासकेंद्राने दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपलेली आहे. अभ्यास केंद्राची रौप्यमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.
उल्लेखनीय
शैक्षणिक वर्ष 2013-2014 मध्ये एफ. वाय. बी. ए. या वर्गातील कु. ढवळे अनघा सुनील हिने 100 मीटर धावणे, गोळा फेक, हतोडा फेक या बाबींमध्ये पुणे विभागीय पातळीवरील पुणे येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये पार पडलेल्या मुक्त विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन 36.96 मीटर भालाफेक व 12.03 सेकंदांमध्ये 100 मीटर धावणे असे एकाच वेळी दोन विक्रम विद्यापीठामध्ये प्रस्थापित करत प्रथम क्रमांक प्राप्त केला. हे विक्रम अजूनही कु. ढवळे अनघाच्या च नावावर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक येथे झालेल्या 'महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2013 (अश्वमेघ)' मध्ये भालाफेक या बाबत द्वितीय क्रमांक प्राप्त करून पंजाब विद्यापीठ, पटियाला (पंजाब) याठिकाणी संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
शैक्षणिक वर्ष 2017- 2018 मध्ये एफ. वाय. बी. ए. या वर्गातील विद्यार्थिनी कु. जगदाळे अश्विनी सुरेश हिने लांब उडी या बाबींमध्ये पुणे विभागीय पातळीवरील पुणे येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये पार पडलेला मुक्त विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून दापोली येथे झालेल्या 'महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2017 (अश्वमेघ)' मध्ये सहभाग घेतला.
मे 2018 मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये अभ्यासकेंद्राची टी. वाय. बी. ए. या वर्गातील विद्यार्थ्यांनी कु. सोडनर सुनिता मच्छिंद्र हिने संपूर्ण विद्यापीठांमध्ये बी.ए. मध्ये प्रथम क्रमांक व इतिहास विषयांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्या यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, वेणूताई चव्हाण सुवर्ण पदक, सावित्रीबाई फुले सुवर्ण पदक, अहिल्याबाई होळकर सुवर्ण पदक व भालचंद्र फडके सुवर्ण पदक असे एकूण पाच सुवर्णपदकाची मानकरी ठरली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नागेश्वर राव यांच्या मुख्य उपस्थितीतमध्ये नाशिक येथे झालेल्या पदवी प्रदान समारंभामध्ये तिला गौरविण्यात आले.
या विभागाचे काम केंद्रप्रमुख म्हणून मा. मुख्याध्यापक श्री. रवींद्र वाघोली केंद्रसंयोजक म्हणून श्री. संजय वलटे व श्री. संतोष देशपांडे व केंद्रसहाय्यक म्हणून श्री. अमोल निंबाळकर हे काम पाहतात.